Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद शिवारातून महावितरण कंपनीच्या सामानांची चोरी; अज्ञातांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद शिवाराच्या शेतातून महावितरणच्या मालकीचे विद्यूत वाहिनीचे ३० हजार रूपये किंमतीचे तार अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद ग्रामीण भागात विज महावितरण कक्षाच्या मालकिचे सुनसगाव रोडवरील नशिराबाद शेतशिवारात सामान ठेवले जाते. यात ३० हजार रूपये किंमतीचे लघुदाब वाहिनीचे तीन फेजचे तार असे अंदाजे ४ वायर अंदाजे १ हजार २०० मीटर एएनटी कन्डक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार २८ नोव्हेबर रोजी लक्षात आला. महावितरण कंपनीचे कर्मचारी माधुरी गुलाब पाटील (वयृ-३०) रा. संत सावता नगर जळगाव यांच्या फिर्यादीवरून नशीराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version