नशिराबाद येथे बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकुण ७३ हजार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रामलाल चौबे (वय-६८) रा. नशिराबाद ग्रामपंचायत जवळ, नशिराबाद हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. काही कामाच्या निमित्ताने ते बाहेरगावी ६ मे ते ८ मे दरम्यान घर बंद करून गेले होते. घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याचे -चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ८ मे मे रोजी हेमंत चौबे रात्री घरी आले, तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसून आले, त्यांनी आत प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला व घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सोमवारी ९ मे रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.12:36 PM

Protected Content