Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे पूर्ववैमनस्यातून एकास हॉकी स्टीकने मारहाण; चौदा जणांवर गुन्हा

नशिराबाद प्रतिनिधी । पुर्ववैमनस्यातून एका तरूणावर १४ जणांनी हॉकीस्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जखमीस जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुबेर शेख जहीर तरूण बसस्थानक परिसरात एकटा जात असल्याची संधी साधून शहरातील १४ जणांनी अचानक हल्ला चढवत हॉकी स्टीकने मारहाण केल्याची घटना शनिवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या काही महिन्यापुर्वी पीस यासीन मिया कादरी यांच्या उरूसानिमित्त कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यातून हा वार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जुबेर यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शेख युनुस शेख मिया यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस स्थानकात संशयित आरोपी असलम शेख, जलाल मेंबर, जुबेर शेख, फारुक शेख, वकार शेख, शाकीर असलम शेख, हर्षद आरिफ शेख, आरिफ शेख रईस, सलीम उद्दीन शेख, ईतेराज सलीम उद्दीन शेख, जुबेर शेख, फारुख शेख अशा १४ जणांविरुद्ध कलम ३२६, ३२५, ३२३,५०४, ५०६, १४३, १४७, २६९, २७० प्रमाणे नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके करीत आहे.

Exit mobile version