Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे दोन गटात तुफान हाणामारी; तीन जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील नशिराबाद येथील पेठभागात हसण्यावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत तीन जण जखमी झाले. याप्रकरणी परस्पर विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील पेठभागात पाहून हसल्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याने दोन गटात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत गणेश देविदास धनगर (वय-२४), ज्ञानेश्वर दिलीप नाथ (वय-२३) आणि कमलेश दिलीप नाथ हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. यात गणेश देविदास धनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित दिलीप नाथ, भावलाल दिलीप नाथ, अवि दिलीप नाथ, दिलीप काशीनाथ नाथ यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या गटातील ज्ञानेश्वर दिलीप नाथ याने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश देवीदास धनगर, देवा देविदास धनगर, आबा पांडूरंग धनगर, बापू पांडूरंग धनगरी, पांडूरंग धनगर आणि लक्ष्मीबाई धनगर याच्याविरोधात सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव आणि पोहेकॉ युनुस शेख करीत आहे.

Exit mobile version