Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे चोरट्यांनी चक्क घरासमोर उभे मालवाहू वाहन चोरून नेले

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथे घरासमोरून चोरट्यांनी चक्क दोन लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याप्रकरणी मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नशिराबाद येथे निचवास मोहल्ला येथे शेख शोहेब शेख शेख युनिस वय 32 वास्तव्यास आहेत. शेख शोहेब हे वाहन चालक असून त्यांच्याकडे मालवाहू वाहन आहे. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे शेख शोहेब यांनी एम.एच ०४ एफ.पी.७१०७ या क्रमांकाचे मालवाहू वाहन घरासमोरील अंगणात उभे केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता घरासमोर उभे मालवाहू वाहन दिसून आले नाही. गावात तसे परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र मालवाहू वाहना बाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर चोरीची खात्री झाल्यावर शेख शोहेब यांनी मंगळवारी सायंकाळी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत

Exit mobile version