Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकऱ्याच्या खळ्यातील गोठ्यात बांधलेल्या ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवाशी सुरेश लिलाधर झोपे (वय-६३) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त असून गुरांसह शेतीचा व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या दोन म्हशी गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात बांधलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आला. याबाबत सुरेश झोपे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Exit mobile version