Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे गणरायाचे उत्सहात आगमन

नशिराबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | येथील  विष्णू मंदिरात श्री गणरायाचे मोठ्या थाटात  आगमन झाले. यावेळी १५० वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा पार पडला.

 

 

 

श्री गणेश चतुर्थीला  श्री गणरायाची विधिवत विष्णू मंदिरात स्थापना करण्यात आली.  याप्रसंगी  सार्वजनिक  गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष सचिन नारळे त्यांच्या हस्ते  श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.  ढोल ताशांच्या गाज्र्रात  श्री गणरायाचे आगमन झाले. गणरायाची  १५० वर्षांची परंपरा असलेला पालखीची  मिरवणूक संपूर्ण गावात काढण्यात आली.  सर्व गणेश भक्तांनी श्री गणरायाची मनोभावे पूजन केले.  ही पालखी दुपारी एक वाजता श्री विष्णू मंदिरात दाखल झाली. यानंतर श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.  यावेळी  सार्वजनिक  गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष सचिन नारळे त्यांच्या हस्ते  श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version