Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे एमआयएमतर्फे तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन

नशिराबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे आॅल इंडिया मजलिस ए उत्तेहादुल मुसलीमिन अर्थात एमआयएमच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्ताने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

नशिराबाद शहरमध्ये एमआयएमच्या वतीने सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी अमृतमहोत्सवी स्वांतत्र्य दिनानिमित्ताने प्रमुख रस्त्यांवर तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.  ही रॅली तालुका अध्यक्ष सय्यद वासिफ अली यांच्या अध्क्षतेखाली काढण्यात आली.  हि  रॅली एमआयएम ऑफिस पासून बस स्टँड मार्गे, होळी मैदान आणि सतीबाजार मार्गे पोलिस स्टेशन पासून बस स्टँड पर्यंत आयोजन करण्यात आली होती. या रॅलीत सर्व नागरिकांनी  सहभाग घेऊन आजादी का अमृत महोत्सव साजरा केला. तिरंगा रॅली  यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष रईस सर, उपध्येक्ष अनिस सुतार, महमूद बिल्डर, तालुका उाध्यक्ष याकूब मण्यार, जळगाव तालुका महासचिव सलमान भय्या, माजी शहर अध्यक्ष आसिफ भाई, अफसर पेंटर, ॲड. इक्बाल, जुनैद सर, मुजम्मील मण्यार, आकीब शेख, फुर्कान शेख, अफसर मिर्झा, फजल मण्यार, शोएब बिल्डर आणि सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.

Exit mobile version