Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथील हॉटेल कारभारी येथून एकाची मोटारसायकल लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील हॉटेल कारभारी येथून हॉटेलचालकाची २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल आज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल दिलीप पोतदार (वय-32, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचे नशिराबाद येथे हॉटेल कारभारी म्हणून हॉटेल असून हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता राहुल हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीके २७७२) ने कामावर आला. त्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कामावर निघून गेला. दरम्यान अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री २.३० वाजता समोर आला. राहुलने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याला दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नशीराबाद पोलीस ठाण्यात धाव ठेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात चळवट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार आलिया खान करीत आहे.

Exit mobile version