Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद नगरपरिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागणीचे निवेदन

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावात नगरपरिषदेच्या वतीने घरगुती डस्टबिन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवार ६ जून रोजी सकाळी १० वाजता मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले आहे

 

नशिराबाद गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणीसह इतर काही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत आहे यातच केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभियान याला हातभार म्हणून नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबास कचरा विघटित करण्यासाठी ओला कचरा सुका कचरा यासाठी घरगुती डसबिन उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवार ६ जून रोजी सकाळी १० वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन पक्षाचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मोहन माळी यांनी दिले आहे. दरम्यान लवकरात लवकर यावर विचार करून डसबिन वाटप करणार अशी अपेक्षा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली.

Exit mobile version