नव्या पिढीच्या तरुण नेत्यांसाठी दारं खुली : राहुल गांधी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल जावं. नव्या पिढीच्या तरुण नेत्यांसाठी दारं खुली आहेत, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी एनएसयूआयच्या बैठकीत मांडले आहे.  एएनआय या संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

आजच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता सूचकरित्या आपले मत मांडले. राहुल म्हणाले की, ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे त्यांनी खुशाल जावं. पक्षाचं दारं तुमच्या सारख्या तरुण नेत्यांसाठी खुली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, आमचे युवा सहकारी सचिन पायलट व इतर आमदारांना काँग्रेसने आग्रह केला आणि विचारले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत काही मतभेद असतील तर पक्षासमोर मांडावेत. काँग्रेसमध्ये बहुमत तुमच्या बाजूने आहे, तर ते सिद्ध करण्यासही सांगितले होते. काँग्रेसची एक नव्हे तर दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. त्यांनी यावं व त्यांच म्हणणं मांडावं, यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली होती, अशी माहिती देत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन देखील केले आहे.

Protected Content