Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवी मुंबईत २९ जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन ; पालकमंत्री एकनाथ शिंदेनी केली घोषणा

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. येथील भागांमध्ये दररोज २०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत २९ जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

 

 

नवी मुंबईत जवळपास ४४ कंटेन्मेंट झोन आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे पालकमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. ७ दिवसांसाठी हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान २६ जून रोजी नवी मुंबईमध्ये २२४ नवीन रुग्ण आढळले होते. आता येथील कोरोना बाधितांचा आकडा हा ६ हजाराच्या जवळ पोहचला आहे. दुसरीकडे आतापर्यंत येथील १९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वधू नये, यासाठी लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Exit mobile version