Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवी मुंबईत एका बिल्डरची दिवसाढवळ्या डोक्यात गोळ्या घालून हत्या

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईत एका बिल्डरची पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रवीण तायडे असे हत्या झालेल्या बिल्डरचे नाव असून या घटनेमुळे तळवळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्रवीण तायडे हा एका साथीदारासोबत मोटारसायकलवरुन जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक मारली. त्यानंतर मारेकरुंपैकी एकाने तायडेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी तायडेच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारालाही गोळी लागून तो जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. दरम्यान, घणसोली सेक्टर 21 (तळवली) येथे बांधकाम भूखंड विकसित करण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version