Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवी मुंबईच्या पोर्टमध्ये १ हजार कोटीचे ड्रग्ज जप्त ; सहा जणांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून मुंबईत आलेले तब्बल १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

 

अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पोर्टमध्ये ड्रग्ज आणण्यात आले होते. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आली आहे. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सर्सना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी अमृतसरमध्ये जानेवारीमध्ये पंजाब पोलिसांच्या एसटीएफने १९४ किलो हेरोइन पकडण्यात आले होते.

Exit mobile version