Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीपेठ परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवी पेठ येथील सेंट्रल बँकेच्या बाहेर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल जमनादास यादव (वय-३४) रा. नामदेव नगर, एकमुखी दत्त मंदीरामागे, पिंप्राळा, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ बीसी ४६८३) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० शहरातील नवीपेठ येथील सेंट्रल बँकेसमोर दुचाकीने आला. जवळच दुचाकी पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनीवार १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

 

Exit mobile version