Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीपेठेत मोनाली कामळस्कर फाऊंडेशनतर्फे पक्ष्यांसाठी परळ वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोनाली कामळस्कर फाऊंडेशनच्या वतीने नवीपेठेत जागतिक चिमणी दिनानिमित्त उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी परळचे वाटप आज २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला. 

शहरातील मोनाली कामळस्कर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक स्व. बाळकृष्ण नथ्थू वाणी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जागतिक चिमणी दिवसाचे निमित्त साधून आज सकाळी ११ वाजता नवीपेठेती वृदावन बुकडेपो समोर पक्षांना पाणी पिण्यासाठी परळचे मोफत वाटप करण्यात आले.  

सदरील कार्यक्रमांस माळी समाजाचे प्रमुख व फळ, भाजीपाला आडतेचे संचालक संजय महाजन, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक के. के. राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर काथार वाणी समाजाचे माजी अध्यक्ष विजय नारायण वाणी यांची उपस्थिती लाभली.

यावेळी जवळ-जवळ 200 परळ व धान्यांचे छोटे पॅकेट मोफत वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुधाकर वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत वाणी, वासुदेव वाणी, शंकर वाणी, राजेश वाणी, अजय कामळस्कर, रवींद्र वाणी,  राहुल हरणे,  शरद वाणी,  ललित वाणी, निखिल वाणी, रोहित वाणी, शामकांत वाणी, दिलीप वाणी आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version