Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीपेठेतून व्यापाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । नवीपेठेतील युनियन बँकेसमोर व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्या आला आहे.

अधिक माहिती अशी की, हेमंत लालचंद रूगंठा (वय-३७) रा. नवी पेठ युनीयन बँक हे सोन्याचे व्यापारी आहेत. या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एव्ही ५२०२) क्रमांकाची दुचाकी आहे. १६ डिसेंबर रोजी घरासमोरील युनियन बँकेच्या एटीएम समोर पार्किंगला दुचाकी लावली. रात्री ११ वाजेपर्यंत दुचाकी समोर होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील दुचाकी लांबविल्याचा प्रकार १७ डिसेंबर रोजी उघडकीला आला आहे. परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता मिळून आले नाही. हेमंद रूगंठा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

Exit mobile version