नवीन बसस्थानक आवारातून महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातून महिलेच्या पर्समधून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुलाबशहा इम्रान खान (वय-२०) रा. बिसमिल्ला नगर, मालेगाव या महिला आपल्या पतीसह जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरात नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. १५ मे रोजी कार्यक्रम आटोपून रात्री अडीच वाजेच्या सुमारास जळगाव बसस्थानक आवारात आले. त्यानंतर बस क्रमांक (एमएच ४० एन ९६४४) बसमध्ये बसल्याानंतर त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ५२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे लक्षात आले. त्यानंतर २३ मे  रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे करीत आहे.

Protected Content