नवीन बसस्थानकात महिलेची ५ हजार रूपये लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारात आलेल्या महिला प्रवासीच्या पर्स मधून ५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहिणी प्रदीप कुमावत (वय-३०, रा, तांबोळे बुद्रुक ता, चाळीसगाव) या महिला खाजगी कामानिमित्त जळगाव शहरात आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या होत्या. २१ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या जळगाव शहरातील नवीन बस स्थानकात आलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या जवळ असलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपयांची रोकड लंबवल्याची घटना उघड केली आहे. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु पैशांची कुठलाही माहिती न मिळाल्याने अखेर सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

Protected Content