Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीन बसस्थानकाच्या आवारात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवीन बसस्थानकाच्या आवारात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार शनिवार दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघड झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात शनिवार  २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अनोळखी वय अंदाजे ६० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत येथील प्रवशांनी जिल्हापेठ पोलीसांना कळविण्यात आले. जिल्हापेठ पोलीसांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांनी मयत घोषीत केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.

 

Exit mobile version