Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत लेखन साहित्य व पाठ्यपुस्तके पुरवा; भाजपाचे निवेदन

चोपडा प्रतिनिधी । कोरोना महामारीमुळे मजुरांच्या हाताला काम नाही, निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांवर हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे शासनाने नववी तेबारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय लेखन साहित्य व पाठ्यपुस्तके देण्याची मागणी भाजपाच्यावतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी मुळे मजुरांचे हातचे काम गेले तर निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे , वारववर शेतकऱ्यावर आपत्ती कोसल्या मूळे त्याना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कुटुंम्बाचे पालन पोषण, मुलांच्या शैक्षणीक गरजा कश्या पूर्ण कराव्यात हा यक्ष प्रश्न त्यांचे पुढे आज आवासुन उभा आहे. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सत्र 2020-21 साठी पाठयपुस्तक व लेखन साहित्य मोफत पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक यांच्याहस्ते निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
सदर निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, पं.स.भापती आत्माराम म्हाळके, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, औद्योगिक वसाहत चेअरमन तथा माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष देविदास पाटील, विठ्ठल पाटील, लक्ष्मण माळी, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस गणेश पाटील भरतसोनगिरे , अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष राज घोगरे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस रितेश शिंपी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करताना सर्व उपस्थित होते.

Exit mobile version