Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवनिर्वाचित उपमहापौर पाटील यांनी घेतली माजी मंत्री एकनाथराव खडसेंची भेट

 

जळगाव, प्रतिनिधी  । मनपाचे नवनिर्वाचित उपमहापौर व नगरसेवकांनी  माजी मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेच्या  अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांची सदिच्छा भेट घेतली.

महापालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर कुलभुषण पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन संकत, अॅड.  दिलीप पोकळे, गजानन देशमुख, कुंदन काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा मा.महसुल-कृषी मंत्री एकनाथराव खडसे  व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवा नेत्या तथा जिल्हा बैंकेच्या अध्यक्षा  अॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांची मुक्ताईनगर फार्म हाऊसवर सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  अॅड..रविंद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रविंद्र पाटील, नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, डॉ. अभिषेक ठाकुर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, चंद्रकांत कोळी  व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Exit mobile version