Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नर्मदा बचावच्या सेवाभावी संस्थेविरुद्ध इडीची कारवाई

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृतसेवा – नर्मदा बचाव आंदोलनच्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सेवाभावी संस्थेविरुद्ध आंदोलनासाठी मिळालेल्या निधीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भाजपा पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून इडी कडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात ईडी तर्फे तक्रार दाखल झाली आहे. गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान सेवाभावी एफआयआर दाखल केली आहे. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने तक्रार केली होती. राजकीय नेत्यांपाठोपाठ आता ईडीने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात न्याय मिळवून देणाऱ्या एनजीओवर कारवाई केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चौकशीसाठी सहकार्य देणार आणि कायदेशीर कारवाई जरूर करणार
दरम्यान मेधा पाटकर यांनी, सेवाभावी संस्थेवर झालेली कारवाई ही चुकीची असून जन आंदोलनाला व संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे. नंदूरबारचे माजी जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार माझगाव डॉक या सार्वजनिक उद्योगाने नर्मदा नवनिर्माण अभियानासाठी जो निधी देण्यात आलेला होता, त्या बद्दल शंका कुशंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. माझगाव डॉकने नंदूरबार जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांना अनेक प्रकारची मदत दिली आहे. इडी ने केलेल्या कारवाईला यावेळी पुढे जी काही कारवाई होईल, चौकशी झाली तर त्यामध्ये सहकार्य दिले जाईल, परंतू योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नसल्याचे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version