Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नरहरी झिरवळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

 

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांची आज विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचे जागावाटपात ठरले होते. मात्र, उपाध्यक्षांची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नव्हती. या निवडणुकीत भाजप आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते.

Exit mobile version