Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नदीत बुडून वयोवृध्दाचा मृत्यू

मुक्ताईनग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोथळी येथील नदीत ७३ वर्षीय वयोवृध्दाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, महादेव जयराम बोदडे (वय-७३) रा. जाफरापूर ता. तिव्हारा. जि. आकोला हे कामा दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आले होते. दरम्यान बुधवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या कोथळी नदीत बुडून मृत्यू झाला. सुरूवातीला अनोळखी म्हणून मयत होते. त्यांच्या खिश्यात आधारकार्ड आढळून आले. महादेव बोदडे असे नाव असल्याचे समोर आले आहे. मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जाधव व पवार यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मा‍त मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version