नत्थूबापूंच्या दर्ग्यावर चढविली भगवी चादर : हिंदू-मुस्लीम एकोप्याचे दर्शन

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असणार्‍या नत्थूबापू यांच्या दर्ग्यावर आज भगवी चादर चढविण्यात आली.

सालाबादा प्रमाणे एरंडोल येथील हिंदू मुस्लिमाचे आदरस्थान असणार्‍या नथ्थूबापुंना पांडवनगरी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गेल्या अकरा वर्षापासून हिंदू-मुस्लिमांकडून आदराने व गुण्यागोविंदाने भगवी चादर चढविण्यात येते. या उत्सवाबद्दल तरुणाई मध्ये मोठा उत्साह पहावयास मिळतो. आज देखील हाच उत्साह दिसून आला. राम मंदिराला व विठ्ठल मंदिराला माल्यार्पण करून पांडव वाड्यापासून सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक मारवाडी गल्ली मार्गे शिवाजी पुतळा मार्गे छत्रपतींना माल्यार्पण करून नथ्थूबापुच्या दर्गाह पोहचली.

दरम्यान मोठ्या ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथक सह सर्वधर्मीय आनंदाने या उत्सवात सहभागी झाले. यंदा आमदार चिमणराव पाटील ,उ.बा. ठा. गटाचे जेष्ठ शिवसैनिक रमेश महाजन ,जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,क ुणाल महाजन,कुणाल पाटील,भोला पवार, आकाश महाजन,सत्यम परदेशी,शेखर ठाकूर,मयूर महाजन ,मयूर बिर्ला,भूषण सोनार,भूषण चौधरी,राजेश शिंपी,भुरा पाटील,दिनेश महाजन,कैलास भोई,रोहिदास महाजन,रोहित पवार,उमेश साळी ,नितीन बोरसे,प्रशांत महाजन, नितीन जगताप सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी एरंडोल पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Protected Content