Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नटराज टॉकीज परिसरात राहत्या घराच्या ओट्यावरून दुचाकी लांबवली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील नटराज टॉकीज परिसरात राहत्या घराच्या ओठावरून दुचाकी लांबविल्या प्रकरणी मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील नटराज टॉकीज परिसरात लुंकड प्रोव्हिजन समोर प्रवीण उर्फ नंदकुमार श्रीकृष्ण मंडोरे वय 56 हे वास्तव्यास आहेत. २ ऑक्टोबर रोजी प्रवीण कुमार मंडोरे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांची एम.एच. १९ ए.टी. २५९२ या क्रमांकाची दुचाकी घराच्या ओट्यावर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ३ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आल्याने ४ ऑक्टोबर रोजी प्रवीण मंडोरे यांनी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून दहा हजार रुपयांची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी हे करीत आहेत.

Exit mobile version