नगर परिषदेचा ढिसाळ कारभार : फालक नगरातील गटार अद्यापही उघडी

यावल,   प्रतिनिधी । येथील फालक नगरातील एका तरुणाला डेंग्यूमुळे आपला प्राण गमवावा लागलेला असतांना नगरपरिषदेने याच परिसरात असलेल्या गटारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा केलेला नाही. नगर परिषेदेच्या या ढिसाळ नियोजनाबाबत  परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणत रोष व्यक्त होत आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फालक नगर या कॉलनीतील फालक नगर बसथांबा ते आयशानगर मार्गावरील डी. बी. पाटील सर यांच्या घरा समोरील मोकळ्या जागेवर अनेक वर्षापासुन गटारीचे काम झाले नसल्याने त्या ठीकाणी दृर्गंधीचे घाण सांडपाणी जमा झाले आहे. या परिसरात डांसाचा उपद्रव वाढल्याने नागरीकांमध्ये आपल्या कुटुंबातील आरोग्याच्या दृष्टीने भितीचे सावट पसरले आहे.  याबाबत यावल नगर परिषदकडे परीसरातील नागरीकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील नगर परिषद प्रशासनाकडुन थातूरमातुर चौकशी वगळता कुठलेही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप येथील रहिवाशी करत आहेत. सद्या यावल शहरात व परीसरात डेंग्यु या घातक आजाराची साथ पसरली आहे. नगर परिषदेने तात्काळ नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करून तात्काळ याठिकाणी गटार बांधावी अन्यथा या परिसरातील नागरीकांच्या संतापाचा उद्रेक होईल असा इशारा येथील रहिवाश्यांनी दिला आहे.

Protected Content