Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरसेवक दारकुंडे यांच्या प्रयत्नांनी स्मशानभूमीमधील बंद बोरवेल दुरुस्त

जळगाव, प्रतिनिधी । आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शिवाजीनगर स्मशानभूमीचे पाहणी केली असता त्यांना हिंदू मुस्लिम स्मशानभूमी मध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बोरवेल बंद पडल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत मनपा अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर बोरवेल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.

शिवाजी नगर मधील हिंदू मुस्लिम स्मशानभूमी मधील मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बोरवेल बंद पडल्या आहेत. नगरसेवक नवनाथ दारकुंडे स्मशानभूमीची पाहणी केली असताना तेथील लावलेली झाडे सुकत असल्याचे त्यांना दिसले. नगरसेवक दारकुंडे यांनी वॉचमनला याबाबत केल्यावर त्याने सांगितले बोरवेल बंद असल्या कारणाने ते झाडे सुकत आहेत. नगरसेवक दारकुंडे यांनी कनिष्ठ अभियंता सुनील भोळे यांना फोन करून सांगितले की दोन्ही स्मशानभूमी मधील बोरवेल बंद आहेत, त्या त्वरित चालू करण्यात याव्यात.भोळे यांनी तत्काळ कर्मचारी पाठवून हिंदू स्मशानभूमी मधील बोरवेल सुरू केली व मुस्लिम स्मशानभूमी मधील स्टार्टर चे काम चालू केले आहे.

Exit mobile version