Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नंदुरबारमध्ये 20 लाखांचा दरोडा

 

 

 

नंदुरबार : वृत्तसंस्था । गुजरातमधून व्यापार करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या वाहनचालकासह मालकाला मारहाण करत लुटमार करण्यात आली  या दरोड्यामध्ये कपड्यांच्या 128 गठाणांसह सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला.

 

दरोडेखोरांनी आयसर गाडीला थांबवून चालकाचे हातपाय बांधत ही लूट केलीय. यामध्ये दरोडेखोरांनी आयसर चालकासह इतर दोघांना मारहाण केली आहे. नंदुरबार वाका चार रस्त्यावर ही घटना घडली.

 

जळगाव जिल्ह्यातील म्हसवे येथील रहिवाशी किशोर संतोष पाटील आयसर ट्रक घेऊन अहमदाबाद येथून कापडाचे गठाण भरुन अमरावतीकडे निघाले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांच्यासमोर एक अज्ञात ट्रक येऊन उभा राहिला. ट्रकमधील एकाने आयसर चालक संजय मच्छिंद्र पाटील यांच्या हात तसेच खांद्यावर मारहाण केली. गाडी मालक किशोर संतोष पाटील यांचेही हातपाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली.

 

चार दरोडेखोरांपैकी एकाने आयसर गाडी अज्ञात ठिकाणी नेली. गाडीला अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांनी जबरी लूट केली. यामध्ये जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला.  लूट करणारे चौघेही मुद्देमाल घेऊन पसार झाले.

 

संजय पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस दरोडेखोरांचा तपास गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात करत आहे.

 

Exit mobile version