Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धोका वाढला : राज्यात ओमिक्रॉनचे 68 रुग्ण

मुंबई प्रतिनिधी – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात ओमिक्रॉनचे पेशंट सुद्धा वाढू लागल्याचे आज दिसून आले आहे.

 

राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  आज राज्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल आहे.मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे, मुंबईत पुन्हा 8000पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 8 हजार  82 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे.

 

दरम्यान राज्यातील आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये 40, पुण्यामध्ये 14, नागपूरमध्ये 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.

 

राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 578 इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील असून ती संख्या 368 इतकी आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागत असून पुणे शहरात आतापर्यंत 63 रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत सापडलेल्या 578 रुग्णांपैकी 259 रुग्ण हे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी 26 रुग्ण हे राज्यातील नागरिक आहेत. तर 9 रुग्ण हे परदेशी नागरिक आहेत. 7 रुग्ण हे ठाणे तर 4 रुग्ण हे कोल्हापूरातील आहेत.

Exit mobile version