Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धुळ्यात कोरोनाचा दुसरा बळी ; २२ वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू

धुळे (प्रतिनिधी) कोरोनामुळे धुळे येथे २२ वर्षीय महिलेचा आज पहाटे सहा वाजता मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मयत महिला मालेगाव येथील रहिवाशी असून तिला उपचार्थ धुळ्याच्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मालेगाव येथील असलेल्या या महिलेचा करोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शिवाय तिला तीव्र अशक्तपणा आणि हृदयाचा देखील त्रास होता. ७ एप्रिल रोजी धुळे येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. दरम्यान, धुळ्यातील मृताची संख्या २ वर पोहचली आहे. दरम्यान, साक्री येथील कोरोना संशयित ५३ वर्षीय व्यक्तीला ८ एप्रिल रोजी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु त्यांचा एक दिवसापूर्वी पहाटेपूर्वी १.३० वाजता मृत्यू झाला होता. त्यांनतर त्याचा अहवाल पॉझेटीव्ह आला होता.

Exit mobile version