Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धुळेपाड्याच्या आदिवासी वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील धुळेपाडा परिसरातील आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. यात आता येथील सामाजिक संघटना आक्रमक झाली असून सदर समस्या तातडीने सोडवावे यासाठी शहरातील पंचायत समितीत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्ती पाडयातील नागरीकांची गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यातच शासनाने मंजुर केलेले जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत काम अडकले आहे. ग्रामपंचायतीच्या शिवारात आदीवासी बांधवांना पाणी मिळावे यासाठी निळे निशाण सामाजीक संघटनाच्या वतीने येथील पंचायत समितीत तब्बल चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ठीय्या आंदोलन पार पडले. मात्र अधिकाऱ्यांच्या लिखीत पत्रानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. तत्पूर्वी धुळेपाडा हे सुमारे ४०० लोकवस्तीचे गाव असुन , या ठीकाणी ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या आदेशाने जल जिवन मिशन अंतर्गत तालुक्यातील आदीवासी वस्तींसाठी ‘हर घर जल’ या योजनेस मंजुरी दिली होती. सुमारे २५ लक्ष रुपये खर्चाच्या योजनेच्या कुपनलीकेच्या कामास काही दिवसापुर्वी सुरूवात झाली. मात्र सांगवी ग्रामपंचायत आणि बोरखेडा ग्रामपंचायतच्या शिवार वादामुळे सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम थांबविण्यात आल्याने संत्पत झालेल्या ठिय्या आंदोलन केले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , नंदाताई बाविस्कर , महीला मंचच्या तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे , युवक चे तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल, अनिल इंधाटे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेकडो आदीवासी बांधव आदी उपस्थित होते. यावेळी निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाउस्कर यांनी पंचायत समितीच्या कारभाराबद्दल व ग्रामस्थांच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांची उदासीनता पाहुन नाराजी व्यक्त केली ,तसेच आंदोलनकर्त्यांशी सहाय्यक . गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, ग्रामीण पाणीपुरवठाचे सुरवाडे , अभियंता पी. बी . देसले यांच्या मध्यस्थीवे तात्काळ तात्रींक अडचणी दुर करून काम सुरू करण्यात येइल असे लिखित आश्वासन् मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

Exit mobile version