Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेत तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

मुंबई – लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । धावत्‍या रेल्वेत वीस वर्षीय तरूणीने कपड्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  धावत्या रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास समोर आली आहे. संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळाली नाही. दरम्यान रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता, २० वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे.

 

तिच्या गळ्याभोवती एक कपडा गुंडाळलेला होता. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती.  मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरापर्यंत जाणार होती. दरम्यान रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित तरुणीसोबत एक व्यक्ती आणि लहान मुलगा बोरीवलीपासून सोबत प्रवास करत होते. पण ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यापासून दोघंही फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे

 

Exit mobile version