Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेखाली मृत्यू झालेल्या ‘त्या’ व्यक्तीची ओळख पटली

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कजगाव रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झालेल्या अनोळखी पुरूषाची ओळख पटली आहे. मयत हा कजगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / ११ / १३ दरम्यान एका अनोळखी इसमाचा धावत्या रेल्वेखाली सापडुन मृत्यू झालेल्या घटना २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. दुर्दैवी मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटली असुन पंडित न्हानु कांबळे (वय – ५७) असे आहे. ते कजगाव येथील रहिवाशी असुन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार मधुसूदन भावसार यांनी सहानिशा करुन त्यांचे नातेवाईक यांच्या स्वाधीन केला आहे. मयत पंडित कांबळे यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, ४ मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version