Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेखाली प्रौढाने संपविले जीवन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेस्टेशनजवळ दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेख इरफान शेख याकुब मनियार (वय-४५) रा. हाजी अहमद नगर, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नातवाईकांनी दिलेल्या माहितीनसार, शेख इरफान शेख याकुब मानियार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह हाजी अहमद नगर, सलार नगर जवळ जळगाव यांच्यासह वास्तव्याला होते. बांगड्यांचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्याचे सराफ बाजारातील भवानी माता मंदीराजवळ दुकान लावू बांगड्यांचा व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबार माहेरी कामानिमित्त दोन दिवसांपासून गेलेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान हे घरी एकटेच होते. गुरूवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहिण मलेकाबी यांच्याकडे गेले. सकाळी नाष्टा करून माझ्यासाठी डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. दरम्यान, शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे सकाळी ९ वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरात सर्व काही ठिक असतांना शेख इरफान यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न नातेवाईकांकडून केले जात आहे. मयताच्या पश्चात आई फातेमाबी, पत्नी रूखसानाबी, मुजाहिद व जयद ही दोन मुले, लहान भाऊ सलिम शेख व बहिणी असा परिवार आहे.

Exit mobile version