Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ११ डिसेंबर रोजी पहाटे उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रविवारी ११ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ नरेंद्र नलवाडे, नरेंद्र शिंदे, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मयतची ओळख पटली नसुन रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ज्ञानेश्वर पाटील हे घेत आहे.
Exit mobile version