Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या प्रवाशी रेल्वेसमोर सापडुन एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निजामुद्दीनहुन हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशी रेल्वे (क्रं. २०६५८) खाली सापडुन पाचोरा रेल्वे स्थानका जवळ रेल्वे खंबा कि. मी. क्रं. ३७१ / २५ नजीक एका २५ वर्षीय (अंदाजीत वय) तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांचेसह घटनास्थळ गाठत घटनास्थळाचा पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयताचा रंग गौरवर्णळ अंगावर निळ्या रंगाची जीन्स पँट, पिवळ्या फिक्कट रंगाचा फुलबाहीचा शर्ट, उजव्या हातावर एस व सुनिल असे गोंधलेले आहे. सदर इसमा बाबत कुणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर (९०२८१५२९६७) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

Exit mobile version