Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

 

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी तरूणाचा मृत्यू झाल्याने शुक्रवारी पहाटे मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा कि. मी. क्रमांक ३७१/२८/३० दरम्यान अप रेल्वे लाईनवर आज शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वे खाली सापडुन अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. मयत अनोळखी इसमाची उंची ५ फुट ६ इंच, रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे, उजव्या हाताच्या दंडावर दिल आकाराचे स्टॅच्यु स्केच तसेच अंगात निळ्या हिरव्या रंगाचा चेक्स असलेला फुल बाहीचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. मयताचे शवरुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार, बबलु मराठे यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत अनोळखी इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी ९०२७१५२९६७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांनी केले आहे.

Exit mobile version