Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्यासह व्हॉट्‌सअॅप ग्रुप अॅडमीनविरुद गुन्हा

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) एका ठराविक धर्माच्या नागरिकांकडून कुठल्याही प्रकारचे साहित्य खरेदी करु नये, अशी जनमानसात द्वेष निर्माण करणारी पोस्ट दोन दिवसांपूर्वी पिंपरी मधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली होती. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह एका सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पिंपरी-चिंचवडमधील अमित भालेराव हा ‘अमित भालेराव मित्र परिवार’ या ग्रुपचा अॅडमीन आहे. तर सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. सुशीलकुमार याने त्या व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर “धर्माच्या विशिष्ट समाजाची व्यक्ती भाजी मंडईत विक्री करताना आढळली, तर त्यांच्याकडून काही खरेदी करु नका. तसेच, त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाची पोस्ट केली होती. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या काही तासांत संबंधित ग्रुप अॅडमीन आणि पोस्ट टाकणाऱ्या सदस्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version