Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिषा बांगर, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ, स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वप्निल रावेरकर, लोकप्रतिनिधी जनार्धन कोळी, माजी सरपंच रेखा कोळी, विदगावचे माजी सरपंच कैलास जळके, डिकसाईचे माजी सरपंच पुंडलिक सपकाळे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गुरूवारी ९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” कार्यक्रमांतर्गत गरोदर माता, अति जोखमीच्या गरोदर माता व स्तनदा माता तसेच “जागृक पालक तर सुदृढ बालक” अभियानांतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी आणि “असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत” उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग असे १३० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात येवून त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय “जागरूक पालक तर सुदृढ बालक” कार्यक्रमांतर्गत सावखेडा येथील लिलाई बालकाआश्रमातील २८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

शिबीर यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राहुल बनसोडे, डॉ. अश्विनी विसावे, राजेंद्र बारी, धनराज सपकाळे, व्ही. टी. महाजन, प्रियंका मंडावरे, निलेश पाटील, महेश वाणी, सुवर्ण नाव्ही, दीपक कोळी, मयूर पाटील, सुनील कोळी, राजू सपकाळे व संगीता घेर, आशा सेविका वंदना सोनवणे, साधना पाटील, शीला कोळी, आशा कोळी, सविता सरोदे व लक्ष्मी माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version