Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धामणगाव प्रा.आ. केंद्रातर्फे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन सरपंच गोकूळ सपकाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ यांच्याहस्ते करण्यात आले.

 

आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व तालुक्यात सोमवार २५ एप्रिल ते २ मे दरम्यान १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटात राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व ता. आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव कार्यक्षेत्रात विदगाव, उपकेंद्र ममुराबाद, मोहाडी व सावखेडा बु. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले व डॉ. अजय सपकाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, धनराज सपकाळे, आरोग्य पर्यवेक्षिका प्रतिभा चौधरी हे मोहीम राबवित आहेत.

 

वयवर्ष १ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण ३४१९ मुला- मुलींना अंगणवाडी, प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयात जंतनाशक गोळ्या समक्ष खाऊ घालण्यात आल्या.

 

पालकांनी जंतनाशक मोहिमेस सहकार्य करावे असे आव्हान डॉ. अजय सपकाळ यांनी केले आहे. जंतनाशक कार्यक्रमाच्या आरोग्य पथकात डॉ. अश्विनी विसावे, डॉ. वृषाली पवार, डॉ. राहुल बनसोडे, प्रिया मंडावरे, व्ही. टी. महाजन, महेश वाणी, निलेश पाटील, घनश्याम लोखंडे, राहुल लाडवंजारी , पंकज तायडे , चंद्रकला साठे, बबीता करोसिया, जयश्री कंखरे, अश्विनी धनराळे व नज्जो पठाण, दीपक कोळी, सुनील कोळी, मयूर पाटील, राजू सपकाळे, संगीता घेर व आशा सेविका कविता सपकाळे अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व नोडल शिक्षक आदी सहभागी होते.

Exit mobile version