Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धामणगावात तरुणीची आत्महत्या

 

 जळगाव  : प्रतिनिधी ।  तालुक्यातील धामणगाव येथील २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ३ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी दुर्गाबाई दीपक कोळी (वय २३) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुर्गाबाई यांनी गळफास घेतल्याचे  समजताच  त्यांना तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधकिर्‍यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले.   तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कासार हे करीत आहे.

Exit mobile version