Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धानोरा गावानजीक अपघात; सहा जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-चोपडा रस्त्यावरील धानोरा गावाजवळ आयशर आणि कालीपीली गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव-चोपडा रस्त्यावरील धानोरा गावाजवळ चोपडा कडून जळगावकडे येणारी आयशर क्रमांक ( एमएच ६३ सी४७४७ ) आणि जळगावकडून चोपड्याकडे प्रवासी घेवून जाणारी कालीपीली क्रमांक (एमएच १९ बीयु ४९७७) यांची समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात नितीन सोनवणे (वय ३८) रा. शनिपेठ, जळगाव, मनोज गवळी (वय ३५), रा. शनिपेठ,जळगाव, शोभाबाई आढाळे (वय-३०) पिंप्राळा, जळगाव, श्रीरामरूपसिंग (वय-४५), बन्सीलाल सुरसिंग (वय-३५), घनश्याम आढळकर (वय-३८) सर्व रा.धानोरा हे जखमी झाले असून जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version