धानवड गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड गावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ८ मे रोजी रात्री अल्पवयीन मुलगी ही गच्चीवर झोपलेली असतांना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याचे उघडकीला आले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, तिच्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Protected Content