जळगाव, प्रतिनिधी | मनपा हददीतील करयोग्यमुल्य निश्चित सुधारीत मुल्यांकन कर रदद् करण्यात यावा यासह इतर मागण्यांचे निवेदन धर्मरथ फाउंडेशनचे विनायक किशोर पाटील यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव मनपा हददीतीलमधील रहीवाशीचा आपण प्रस्तावित कर योग्यमुक्त निर्धारणेचे विवरण संदर्भातील आपण नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये आपण येत्या 2021-22 मध्ये अधिकचा कर वसुल करणार आहे. त्यामध्ये आपण तीन पट कर वसुल करत आहोत. त्यामध्ये सामान्य कर, अपेक्षित करयोग्य मुल्य. कर आणि अपेक्षीत वार्षीक भाडेमुल्य कर हा प्रत्यक्ष प्रमाणात वाढवणार आहे. तरी आपण जळगांव शहराची परिस्थिती बघता तिचे नागरीकांना पाई चालता येत नाही. रोड नाही, गटारी नाही, पावसाळ्यात पाणी तुंबते. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आणि कोरोना काळामध्ये नागरीकांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे ते पाहता आपण हा कर रदद् करावा आणि आम्ही जो सध्यास्थितीत कर भरतो आहे त्यानुसार आम्हाला मागील दहा वर्षांपासुन तश्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. तरी आपण प्रशासन म्हणुन अधिकचा कर कसा घेवु शकता हा आमच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण सदरहु सुविधा उपलब्ध करुन दिल्यास आम्ही कर भरण्यास तयार आहोत. तसेच आम्हाला तुम्ही जी नोटीसीचे हरकतीचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत त्या संदर्भात देखील तक्रार देण्यात आली. याप्रसंगी विनायक पाटील यांच्या सोबत गणेश शेळके,राजेंद्र सणस,अजय इंगोले,राजेन्द्र हेबाडे,निशांत पाटील,विनायक पाटील उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/550645615999650