Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धर्मरथ फाउंडेशन आणि मनपातर्फे शिवाजी नगरात सर्वेक्षणास सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धर्मरथ फाऊंडेशन आणि महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शिवाजी नगर परिसरात सर्वेक्षणाच्या कामास सुरूवात करण्यात आली. दररोज जवळपास १०० घरांचे तपासणी करून नागरिकांना कोरोनाविषयी जनजागृती करत आहे.

यावेळी उपस्थित धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, निशांत पाटील, हिरामण तरटे, प्रकाश मुळीक, संतोष भीताडे, भगवान सोनवणे, तुषार सूर्यवंशी, सागर बडगुजर, सुनील महंगाडे, प्रमोद महागडे, धर्मेंद्र चौधरी, संजय अकोलकर, सिद्धार्थ दारकुंडे, अंगणवाडी शिक्षक, मनपा कर्मचारी यासह संस्थेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान जळगाव शहरात आज लॉकडाऊनचा तीसरा दिवस आहे. या काळात अत्यावश्यक व रूग्णांच्या सेवेसाठी धर्मरथ फाऊंडेशन माध्यमातून सहाकार्य करणार असून अधिक माहितीसाठी संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी कळविले आहे.

Exit mobile version