Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव शहरात तिरंगा पदयात्रा

धरणगाव प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातून १०१ मीटर लांबीच्या तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली असून यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे १०१ मीटर तिरंगा पदयात्रेचे आयोजन केलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचा हस्ते याला प्रारंभ करण्यात आला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पुनीलाल महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. याप्रसंगी शिरीष बयस, संजय महाजन, शेखर पाटील, सुनील चौधरी, नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे, नगरसेवक कंखरे, कडू बयस, भालचंद्र माळी उपस्थित होते. याप्रसंगी भाजप गटनेते कैलास माळी, कुडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, बालकवी विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एन. चौधरी, इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. एस .पाटील उपस्थित होते. या रॅलीत सर्व शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच शिक्षक सहभागी होते. यात बालकवी व सारजाई कुडे विद्यालय, पी. आर. हायस्कूल तसेच कॉलेज, इंदिरा कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, महात्मा फुले हायस्कूल तसेच इतर शाळांव नागरिकांचा सहभाग होता.
परिहार चौक मार्गे रॅली भाटिया गल्लीकडून धरणी चौकात आली. विलास महाजन, कैलास माळी, सचिन पाटील यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. बालाजी रोड मार्गे रॅली मोठा माळी वाडा, लहान माळी वाडा, कोठबाजार या ठिकाणी रॅली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, समरसता मंचचे महेश आहेराव यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. विविध ठिकाणी रांगोळी काढून व पुष्पवृष्टी स्वागत झाले.

रॅलीचा समारोप बालकवी शाळेचा प्रांगणात झाला.सामाजिक समरसता मंचचे केंद्रीय सदस्य प्रा. रमेश महाजन यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.दिलीप रामू पाटील यांनी संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन पी. आर. हायस्कूलमधील विद्यार्थिनी बिचवे यांनी केले.

Exit mobile version