Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथे शिवसंवाद यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी मंत्री अदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रा मंगळवारी जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. धरणगाव आणि पाचोरा तालुक्यात सभा घेण्यात येणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी धरणगाव तालुका बैठक घेण्यात आली.

 

या बैठकीत शिवसैनिकाना संबोधताना शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी मार्गदर्शन केले, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शिवसैनिक धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाहीत. शिवसेना या तालुक्यात कायम जिवंत राहील. किती आले किती गेले, तरी शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. शिवसेना एक समुद्र आहे. त्यातून एक बादली पाणी गेले तर फरक पडणार नाही, आता शिवसैनिक आपली ताकत दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत. हजारोंच्या ताफा शिवसैनिकांचा आदित्य साहेब यांच्या सोबत राहील.

 

या बैठकीला उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, वासुदेव चौधरी अहमद खान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, उपजिल्हा संघटक शरद माळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील, प.स. सभापती दीपक सोनवणे यांच्यासह धरणगाव तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version