Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथे बंद घर फोडून ३ लाखाचे दागिने लांबविले; एकाला अटक

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील मोठा माळी वाडा येथे राहत्या घरात सोन्याचे दागिन्यांसह रोक रक्कम असा एकुण ३ हजार ६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एकाला पोलीसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील विजय धनलाल महाजन (वय-४५) रा. मोठा माळीवाडा धरणगाव हे खासगी नोकरीला आहे. ते कामाच्या निमित्ताने १४ जानेवारी रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. १८ जानेवारी रोजी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीला आले. दरम्यान ही चोरी त्यांच्या गल्लीतील राहणारा गजानन तुकाराम माळी (वय-२१) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विजय महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित गजानन माळी यांच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

Exit mobile version